Home / महाराष्ट्र / Pune Election 2026 : गुन्हेगारीची सावली की राजकीय ताकद? पुणे निवडणुकीत आंदेकरच्या उमेदवारीवरून वादळ

Pune Election 2026 : गुन्हेगारीची सावली की राजकीय ताकद? पुणे निवडणुकीत आंदेकरच्या उमेदवारीवरून वादळ

Pune Election 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Election) कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्या कुटुंबातील दोन महिलांना...

By: Team Navakal
Pune Election 2026
Social + WhatsApp CTA

Pune Election 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Election) कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्या कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) आणि सोनाली आंदेकर (Sonali Andekar) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप (Subhash Jagtap) यांनी दिले आहेत.

लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीना देखील निवडणूक लढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. पोलिस रिमांड रिपोर्टनुसार, या दोघींचा आयुष कोमकर हत्याप्रकरणात थेट सहभाग नाही, फक्त बंडू आंदेकर यांच्या घरात कट रचण्यात त्यांचा नाममात्रचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून त्यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत सुभाष जगताप यांनी दिले आहेत.

Pune Election 2026: कोमकर कुटुंबाकडून तीव्र विरोध
हत्याकांडाच्या पीडित आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी राजकीय पक्षांना कळकळीची विनंती केली आहे की, आंदेकर कुटुंबाच्या सदस्यांना निवडणुकीत तिकीट देऊ नका. संजीवनी कोमकर यांनी भावनिक साद घातली आहे. त्या म्हणाल्या, “जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर निदान आमच्यावर अन्याय होऊ नका; आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट दिले गेले तर मी आत्मदहन करिन असा थेट इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.

दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची जोरदार चर्चा आहे. परिणामी याच विषयावर बोलताना आयुष कोमकरच्या आईने राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांना कळकळीची विनंती केली आहे कि, सर्व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे कि जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तरी करू नका. अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली आहे.

अंधेकरांना कृपया निवडणुकीचे तिकीट देऊ नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. आणि तरीही असं झालं तर मी आत्मदहन करून माझं आयुष्य संपवीन,असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी राजकीय पक्षाकडून या विनंतीची कितपत दखल घेतली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रकरण नेमकं काय?

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. आणि या हत्येनंतर आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह १३ जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आयुष्य कोकमकरच्या खुणाचा थरार..

५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आल, आणि त्यानंतर तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी यांनी समर्थ पोलिस ठाण्यात या प्रकरणाबाबत फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह त्याच्या साथीदारांना देखील बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली.

आणि या दरम्यान आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. मात्र गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, आणि या १३ जणांना अटकही करण्यात आली होती. या खटल्यातील आरोपी आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी कृष्णा आंदेकर हा स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.

हे देखील वाचा – Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता लवकरच जमा होणार; पण अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब, पाहा कारणे

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या