Home / महाराष्ट्र / Pune Cycle Race Accident: पुण्यात ‘ग्रँड चॅलेंज सायकल टूर’मध्ये भीषण साखळी अपघात; 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले

Pune Cycle Race Accident: पुण्यात ‘ग्रँड चॅलेंज सायकल टूर’मध्ये भीषण साखळी अपघात; 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण परिसरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ या प्रतिष्ठेच्या...

By: Team Navakal
Pune Cycle Race Accident
Social + WhatsApp CTA

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण परिसरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला भीषण अपघाताचे गालबोट लागले. स्पर्धेदरम्यान झालेल्या एका मोठ्या साखळी अपघातात ७० पेक्षा अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आता गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी-कोळवण मार्गावरून ही स्पर्धा सुरू असताना खेळाडूंचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर इतका प्रचंड होता. कोळवण रोडवर एका ठिकाणी रस्ता अचानक अरुंद झाला आणि तिथेच एक धोकादायक वळण होते. वेगामुळे आघाडीवर असलेल्या खेळाडूला या बदलाचा अंदाज आला नाही आणि त्याचा सायकलवरील ताबा सुटून तो खाली कोसळला. त्याच्या पाठोपाठ येणारे इतर खेळाडू वेगात असल्याने त्यांना सावरण्याची संधी मिळाली नाही आणि एकामागोमाग एक असे सुमारे ७० सायकलपटू एकमेकांवर आदळले.

खेळाडूंची अवस्था आणि नुकसान

या भीषण अपघातात अनेक खेळाडू रस्त्याच्या कडेला फेकले गेले. प्राथमिक माहितीनुसार, बहुतांश खेळाडू किरकोळ जखमी झाले आहेत, तर ४ ते ५ खेळाडूंना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. या घटनेमुळे स्पर्धेत १५ मिनिटांचा व्यत्यय आला होता, मात्र नंतर ही रेस पुन्हा सुरू करण्यात आली.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार?

या अपघातानंतर पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर क्रीडाप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा हाय-स्पीड स्पर्धेचे आयोजन करताना रस्त्यांच्या परिस्थितीचा पुरेसा अभ्यास का केला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरुंद रस्ता किंवा धोकादायक वळणाबाबत खेळाडूंना पूर्वसूचना देणे, तिथे बॅरिकेड्स लावणे किंवा धोक्याचे फलक लावणे आवश्यक होते, मात्र अशा कोणत्याही उपाययोजना नसल्याचा आरोप आता केला जात आहे.

देशभरातील सायकलप्रेमींचे लक्ष लागलेल्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केले जात आहे. मात्र, अशा मोठ्या स्पर्धेत खेळाडूंच्या जिवाशी होणारा हा खेळ दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणातून धडा घेऊन पुढील मार्गावर अधिक खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या