Home / महाराष्ट्र / Pune Land Scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई ; जमीन विकणारी शीतल तेजवानी नक्की आहे तरी कोण?

Pune Land Scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई ; जमीन विकणारी शीतल तेजवानी नक्की आहे तरी कोण?

Pune Land Scam : पुणे येथील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Land Scam Pune) आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani)...

By: Team Navakal
Pune Land Scam
Social + WhatsApp CTA

Pune Land Scam : पुणे येथील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Land Scam Pune) आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शीतल तेजवानी हि याप्रकरणातील मुख्य आरोपी असून तिची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी केली होती. याच दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी देखील दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे सरळ स्पष्ट झाले आणि त्यानंतर काल अखेर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली. तर आज शीतल तेजवानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani)अटक करण्याची मुख्य करणे?

१. शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केल्यामुळे तिला हि अटक झाली आहे.
२. शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी तसेच यामुळे शासनाची फसवणूक केली गेली.
३. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केली हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले.
४. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला
५. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू ठेवला.
६. याबाबत तेजवानी यांची कसून चौकशी करून याबाबतचा खुलासा पोलिसांनी (Sheetal Tejwani)शीतलकडे मागितला होता.

नक्की कोण आहे शीतल तेजवानी?
शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती आणि पत्नी आहेत. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली १० कर्जे, त्याचबरोबर ४१ कोटी रुपयांची १० कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे आणि त्यानंतर सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून त्यांनी कर्ज उचलले. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात ती वापरली गेली. २०१९ ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड झाला. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही हे स्पष्ट झाले. ३१ मार्च २०२१ पर्यंत कर्जांची रक्कम ६० कोटीच्या घरात गेली. जानेवारी २०२३ मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला. सागर सूर्यवंशी ४५ कोटींची मालमत्ता जप्त केली गेली तसेच मे २०२३ मध्ये स्पेशल कोर्टात खटला. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर २०२१मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून २०२३ मध्ये ईडीकडून अटक करण्यात आली.

पार्थ पवारांच जमीन खरेदी प्रकरण नक्की काय?

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेली जमीन ही ‘महार वतन’ ची आहे तसेच या जमिनीला ऐतिहासिक आणि कायदेशीर महत्त्व आहे. महार वतन ही ब्रिटीश काळात आणि त्याआधीही गावांमध्ये एक जमीन अनुदान प्रणाली मानली जायची. पूर्व महार समाजावर गावाचे संरक्षण करण्याची, संदेशवहन करण्याची आणि इतर कानी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या कामा्च्या मोबदल्यात महार समुदायाला हि जमीन दिली जायची.

मात्र या पद्धतीमुळे महार समाजाचे शोषण होत होते, तसेच कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांना कमी जमीन दिली जायची तसेच दिलेली जमीन अनेकदा परतही घेतली जायची. यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही शोषणकारी व्यवस्था संपवण्यासाठी बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन निर्मूलन कायदा, १९५८ आणला. या कायद्याअंतर्गत सरकारने ‘वतन’ म्हणून मिळालेल्या जमिनी परत ताब्यात घेतल्या आणि काही अटी घालून पुन्हा त्यांच्या मालकांना ह्या जमिनी देण्यात आल्या.

त्यामुळे सरकारने या जमीनी परत देताना काही अटी देखील घातल्या होत्या, यातील एक अट अशी होती की, कलम ५(३) नुसार अशी जमीन सरकारी परवानगीशिवाय विकता येणार नाही तसेच हस्तांतरित देखील करता येत नाही. त्यामुळे पार्थ पवारांवर असा आरोप आहे की त्यांच्या कंपनीने सरकारी परवानगीशिवाय हि जमीन खरेदी केली आहे. त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असा याचा अर्थ निघतो. त्यामुळेच आता या प्रकरणात अजून कोणते मोठे खुलासे होणार आहेत हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Gondia EVM : गोंदियात ईव्हीएमच सील तोडल्याचा गंभीर आरोप

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या