Pune Latur Special Train: सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि मराठवाड्यातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी सरकारने एक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ही रेल्वे पुणे (हडपसर) आणि लातूर (Pune Latur Special Train) दरम्यान धावणार असून, 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे ते लातूर विशेष रेल्वे धावणार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 11, 2025
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते लातूर दरम्यान विशेष रेल्वे धावणार असून, यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा… pic.twitter.com/omd9HNBF8P
विशेष रेल्वेचे वेळापत्रक
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, या विशेष सेवेमुळे सणांच्या दिवसांत प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल. कुटुंबातील सदस्य, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे.
रेल्वे क्रमांक 01429 (लातूर ते हडपसर):
- सुटण्याची वेळ: सकाळी 9 वाजून 30 मिनिटे
- थांबे: हरंगुल, धर्मपुरी, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड
- पोहोचण्याची वेळ: दुपारी तीन वाजून तीस मिनिटे
- धावण्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार
रेल्वे क्रमांक 01430 (हडपसर ते लातूर):
- सुटण्याची वेळ: दुपारी 4 वाजून 5 मिनिटे
- थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, उस्मानाबाद, धर्मपुरी, हरंगुल
- पोहोचण्याची वेळ: रात्री 9 वाजून 20
- मिनिटे
- धावण्याचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार
हे देखील वाचा – चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू