Pune Municipal Corporation : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम (Municipal Corporations Election Schedule) आज जाहीर करण्यात आला आहे. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात आमच्या सरकारने केलेलं काम पाहता मुंबईसह सर्वच ठिकाणी जनतेचा कौल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
राज्यात सर्वच ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपसोबत असणार आहे. परंतु पुण्यामध्ये (Pune Election), पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर अर्थात विरोधात असणार आहोत, पण ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणले.
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर; लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षात आता लगबग पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर या आधीच अजित पवारांसोबत चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होईल हे इतकं साधं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत ठरेल.
नगरपालिका निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना आणि भाजप हे महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे निवडणूक लढताना दिसणार आहेत. शिंदेंची शिवसेना आमच्यासोबत असेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
Municipal Corporations Election Schedule : महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर:
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत – २ जानेवारी
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी
मतदान – १५ जानेवारी
निकाल – १६ जानेवारी









