Home / महाराष्ट्र / PMC Election: पुण्यात मतमोजणीची तयारी पूर्ण! पाहा तुमच्या भागातील निकाल कुठे लागणार?

PMC Election: पुण्यात मतमोजणीची तयारी पूर्ण! पाहा तुमच्या भागातील निकाल कुठे लागणार?

PMC Election: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी...

By: Team Navakal
PMC Election
Social + WhatsApp CTA

PMC Election: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग कार्यालय निहाय मतमोजणी केंद्रांचे नियोजन केले आहे. १५ प्रभाग कार्यालयांसाठी स्वतंत्र केंद्रे निश्चित करण्यात आली असून, झोननुसार सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

प्रभाग कार्यालय निहाय मतमोजणी केंद्रे खालीलप्रमाणे आहेत:

  1. बिबवेवाडी: बाबूराव सणस मैदान (कबड्डी मैदान), सारसबाग.
  2. सिंहगड रोड: शरदचंद्र पवार ई-लर्निंग अकॅडमी, वडगाव.
  3. कसब-विश्रामबागवाडा: न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड.
  4. धनकवडी-सहकारनगर: प्रभाग कार्यालय परिसरातील टीन शेड.
  5. घोले रोड-शिवाजीनगर: कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर.
  6. कोंढवा-येवलेवाडी: छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल, कात्रज-कोंढवा रोड.
  7. वानवडी-रामटेकडी: जिजाऊ मंगल कार्यालय, एसआरपीएफ ग्रुप नं. 1.
  8. हडपसर-मुंढवा: कर्मवीर सभागृह, साधना विद्यालय, हडपसर.
  9. येरवडा-कळस-धानोरी: राजाराम पठारे स्टेडियम, खराडी.
  10. औंध-बाणेर: बॅडमिंटन हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी.
  11. कोथरुड-बावधन: एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरुड.
  12. भवानी पेठ: रफी अहमद किडवाई माध्यमिक शाळा, रामोशी गेट पोलीस चौकीजवळ.
  13. वारजे-कर्वेनगर: पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, पौड फाटा.
  14. ढोले पाटील रोड: मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कोरेगाव पार्क.
  15. नगर रोड-वडगाव शेरी: प्रादेशिक कार्यालय परिसर.

सुरक्षा आणि नियोजन

मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर होताना गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे. प्रत्येक केंद्रावर अत्यावश्यक सोयीसुविधा आणि तांत्रिक मदतीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या