Home / महाराष्ट्र / ‘नारी शक्ती’चा ऐतिहासिक क्षण! NDA तून पहिली महिला अधिकाऱ्यांची बॅच पासआऊट

‘नारी शक्ती’चा ऐतिहासिक क्षण! NDA तून पहिली महिला अधिकाऱ्यांची बॅच पासआऊट

NDA Women Cadets | भारतीय लष्कराच्या इतिहासात एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (National Defence Academy) पहिल्या...

By: Team Navakal
NDA Women Cadets

NDA Women Cadets | भारतीय लष्कराच्या इतिहासात एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (National Defence Academy) पहिल्या महिला सह-शिक्षण तुकडीतील 17 महिला कॅडेट्सनी पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला. पहिल्यांदाच महिलांनी एनडीएमधून पदवी प्राप्त केली. महिलांसह 300 पुरुष सहकाऱ्यांनी परेडमध्ये भाग घेतला.

या ऐतिहासिक घटनेत अकादमी कॅडेट कॅप्टन उदयवीर नेगी यांनी 148 व्या कोर्सचे नेतृत्व केले. माजी लष्कर प्रमुख आणि मिझोरमचे सध्याचे राज्यपाल जनरल व्ही. के. सिंह यांनी या पासिंग आऊट परेडचे (Passing Out Parade) परीक्षण करत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने झालेल्या या टप्प्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी या नव्या कॅडेट्सना “नारी शक्ती”संबोधून, त्यांना “महिला-नेतृत्वाखालील विकासाचे प्रतीक” असे गौरवले.

या समारंभात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University – JNU) मार्फत एकूण 339 कॅडेट्सना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये 84 जणांना बीएससी, 85 जणांना कॉम्प्युटर सायन्स, 59 जणांना बीए, आणि 111 जणांना बी.टेकपदव्या देण्यात आल्या.

डिव्हिजन कॅडेट कॅप्टन श्रुती दक्ष हिने कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावून इतिहास घडवला. तिच्या वडिलांची देखील एनडीएमध्ये पार्श्वभूमी असल्याचे तिने नमूद केले. दक्ष म्हणाली, “तीन वर्षांचा हा प्रवास सुरुवातीला आव्हानात्मक होता, पण आता हा एक गौरवाचा क्षण आहे.”

कॉम्प्युटर सायन्स टॉपर कॅडेट कॅप्टन प्रिन्स कुशवाह यांनी सांगितले की, “आम्ही अकादमीला एका नव्या युगात प्रवेश करताना पाहिले, जिथे महिला कॅडेट्सना समाविष्ट केलं गेलं.”

दीन दयाल उपाध्याय विद्यापीठाच्या कुलगुरू पूनम टंडन यांनी विश्वास व्यक्त केला की या महिला कॅडेट्स पुरुष सहकाऱ्यांप्रमाणेच आदर्श नेते म्हणून ओळखल्या जातील. त्यांनी आवाहन केलं, “सन्मानाने सेवा करा, धैर्याने नेतृत्व करा आणि आपल्या मूल्यांशी निष्ठावान राहा.”

2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर, केंद्रीय लोकसेवा आयोगाने महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये अर्ज करण्याची परवानगी दिली. याचमुळे, महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीने 2022 मध्ये एनडीएच्या 148व्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. आता या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या