Home / महाराष्ट्र / Pune News : तुम्हीही सणासुदीला बाहेरून मिठाई आणता का? तर सावधान! दोन महिन्यात तब्ब्ल दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त..

Pune News : तुम्हीही सणासुदीला बाहेरून मिठाई आणता का? तर सावधान! दोन महिन्यात तब्ब्ल दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त..

Pune News : सण कोणताही असला तरी बाहेरून मिठाई घेऊन येण म्हणजे परंपराच आहे. सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला देखील...

By: Team Navakal
Pune News

Pune News : सण कोणताही असला तरी बाहेरून मिठाई घेऊन येण म्हणजे परंपराच आहे. सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. दुधामध्ये आज पर्यंत बरीच भेसळ होत (Adulterated milk) आली आहे. पण आता हि बेसळ जर तुमच्या मिठाई मध्ये होत असेल तर..काही ठिकाणी मिठाईची विक्री हि मोठ्या प्रमाणावर होते, याचाच फायदा घेऊन विक्रेते या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ (Adulterated sweets) करतात. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळ (Food and Drug Administration) शोधण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत गेल्या दोन महिन्यांत सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त केले असल्याची माहित आहे.

या सगळ्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. सण महाराष्ट्राचा, संकल्प अन् सुरक्षिततेचा हे अभियान आता राज्यभर राबविण्यात येत आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व जनहिताचा विचार करून हे अभियान रानवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जनतेस स्वच्छ आणि भेसळ नसलेलं अन्न खाता यावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाकडून ११ ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेदरम्यान अनेक भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. यात प्रामुख्याने तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, भगर अश्या इत्यादी अन्नपदार्थांचा एकूण १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

सणासुदीच्या काळात विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थामध्ये भेसळीबाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ यावर संपर्क साधावा. प्रशासनाकडून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुरेश अन्नपुरे यांनी दिली आहे.


हे देखील वाचा – Test Twenty in Cricket : क्रिकेटमध्ये आला टेस्ट ट्वेंटी’ हा नवा प्रकार ; पारंपरिक कसोटीची गंभीरता आणि टी-२० चा संगम असणारा नवा फॉर्मेट..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या