Home / महाराष्ट्र / Rahul Narwekar : राऊतांविरुद्ध नार्वेकरांचा फिल्मी पलटवार; कुलाबा मतदार संघात उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप, राहुल नार्वेकरांची आरोपांवर स्पष्ट भूमिका

Rahul Narwekar : राऊतांविरुद्ध नार्वेकरांचा फिल्मी पलटवार; कुलाबा मतदार संघात उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप, राहुल नार्वेकरांची आरोपांवर स्पष्ट भूमिका

Rahul Narwekar : मुंबईच्या कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधु मकरंद नार्वेकर भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी लढत आहेत. याच...

By: Team Navakal
Rahul Narwekar
Social + WhatsApp CTA

Rahul Narwekar : मुंबईच्या कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधु मकरंद नार्वेकर भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी लढत आहेत. याच पार्शवभूमीवर नामनिर्देशन अर्ज भरताना विरोधी उमेदवारांना दमदाटी व धमक्या दिल्याचे आरोप समोर आले.

या प्रकरणावर अखेर राहुल नार्वेकर यांनी मौन सोडले. त्यांनी स्पष्ट केले की, हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि विरोधकांकडून दुमत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत, कुलाबा मतदारसंघात कुठलाही वाद अथवा बंडखोरी नाही, असेही सांगितले.

कुलाबा विधानसभेत एकूण सहा जागा असून, भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आधी नाराजीचे वातावरण होते. मात्र, पार्टीने कार्यकर्त्यांशी थेट चर्चा करून परिस्थिती हाताळल्याने आता कोणतीही बंडखोरी उरलेली नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, काही कार्यकर्त्यांनी आपापले अर्ज मागे घेतले असून, त्यामुळे भाजपमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी उरलेली नाही. तसेच, कुलाबा महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांना धमकावल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळले आहे.

कुलाबा मतदारसंघातील भाजप-शिवसेना वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आणि विरोधकांना धमकावल्याचे म्हटले.

यावर नार्वेकरांनी ठामपणे उत्तर दिले. ते म्हणाले, “राऊतांकडून हीच अपेक्षा होती. पराजय होत असताना बिनबुडाचे आरोप करणे आणि रडीचा डाव चालवणे, हे राजकारण नाही. ५ वाजता सर्व अर्जदार होते; २१२ वॉर्डच्या आमच्या उमेदवार होत्या त्यांना अर्ज भरता आला नाही.रडीचा डाव त्यांच्याकडून होतो आहे मी काय आमच्याच भाजपचा अर्ज थांबवू शकतो का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

उबाठाने दुपारी १ वाजता एबी फॉर्म दिले होते.वेळेत अर्ज दिले असते तर त्यांच्या उमेदवारांना अर्ज भरता आले असते असे देखील ते म्हणाले. मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून भूमिका निभावतो तेव्हा निष्पक्ष काम करतो. तसेच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून काम करत असतो.राऊत यांनी पहिले माहिती घ्यावी आणि मग यावर बोलावे. मी काय काम करावं आणि काय नाही हा सल्ला त्यांना देणयाची गरज नाही असा टोलाही नार्वेकर यांनी राऊतांना लगावला.

हे देखील वाचा – Pune Election 2026 : पुण्यातील राजकीय ड्रामा; एबी फॉर्म गिळून दिला प्रतिस्पर्ध्याला धक्का

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या