Home / महाराष्ट्र / Rahul Narwekar Viral Video: अलिबागमध्ये नक्की काय घडलं? राहुल नार्वेकरांची व्हायरल व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया

Rahul Narwekar Viral Video: अलिबागमध्ये नक्की काय घडलं? राहुल नार्वेकरांची व्हायरल व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया

Rahul Narwekar Viral Video: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ठाकरे गटाचे...

By: Team Navakal
Rahul Narwekar Viral Video
Social + WhatsApp CTA

Rahul Narwekar Viral Video: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करत “अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?” असा सवाल उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये काही लोक आणि महिला एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत असून राहुल नार्वेकर तिथून पुढे निघून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

राहुल नार्वेकर यांनी काय स्पष्टीकरण दिले?

या सर्व वादावर राहुल नार्वेकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “मी दोन दिवसांपूर्वी माझ्या शेतजमिनीकडे जात असताना वाटेत दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. मी केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आणि तिथून पुढे निघून गेलो. व्हायरल होत असलेल्या त्या घटनेशी किंवा वादाशी माझा कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे माझे नाव विनाकारण या प्रकरणाशी जोडू नये.”

नेमकी घटना काय?

मिळालेली माहिती अशी की, ही घटना १३ फेब्रुवारी रोजी अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडली. तिथे नार्वेकर एका जागेच्या खरेदी संदर्भात जमीन मोजणीसाठी गेले होते.

मोजणी सुरू असताना लगतच्या जमिनीचे मालक रमेश पाटील यांनी आक्षेप घेतला. नियमनुसार शेजारच्या जमीन मालकाला मोजणीपूर्वी नोटीस देणे आवश्यक असते, मात्र आपल्याला कोणतीही नोटीस दिली गेली नाही, असा पाटील यांचा आरोप होता.

नार्वेकर हे नियमबाह्यपणे जमिनीची मोजणी करत असल्याचा आरोप करत पाटील कुटुंब आक्रमक झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केली. वाद वाढू लागल्यानंतर राहुल नार्वेकर तिथून सुरक्षितरीत्या बाहेर पडले.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करताना अत्यंत बोचरी टीका केली आहे. “राहुल नार्वेकर यांनी तिथून पळ काढला आहे. ही हाणामारी का झाली हे तुम्ही सांगताय की मी सांगू?” असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे. व्हिडिओमध्ये पाटील कुटुंबातील महिला नार्वेकरांना जाब विचारताना आणि आक्रमक पवित्रा घेताना स्पष्ट दिसत आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या