Home / महाराष्ट्र / Raigad News : रायगडमधील धक्कादायक घटना, फेसबुकवरील मैत्री पडली महागात; अडीज वर्ष केला अत्याचार

Raigad News : रायगडमधील धक्कादायक घटना, फेसबुकवरील मैत्री पडली महागात; अडीज वर्ष केला अत्याचार

Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाड (raigad mahad crime) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील मैत्री एका विवाहित...

By: Team Navakal
Raigad News

Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाड (raigad mahad crime) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील मैत्री एका विवाहित महिलेला चांगलीच भोवली आहे. फेसबुकवर एका तरुणाची तिच्याशी ओळख झाली. त्यानंतर ओळख झालेल्या तरुणाने तिच्याशी जवळीक वाढवत वारंवार अत्याचार (raigad mahad crime) केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी गेल्या अडीच वर्षांपासून पीडितेला धमकावत होता तसेच तिचं लैंगिक शोषण करत होता. सुरुवातीला ओळखीतून सुरू झालेल्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू ब्लॅकमेलिंग आणि अत्याचारात (raigad mahad crime) बदलत गेलं. आरोपीने पीडितेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओचा वापर करून तिला धमकावत होता. तसेच तिला या बद्दल कुठे वाच्यता करायची नाही असे देखील सांगितले. सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी पीडित महिलेनं महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.(raigad mahad crime)

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित आहे. तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत फेसबुकवरती ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.

त्याचबरोबर आरोपीने अत्यंत किळसवाणी वर्तणूक केली. त्याने महिलेसोबतचे शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचे व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले, आणि तिचे फोटोही काढले. याच फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करून आरोपीने विवाहीत महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यासोबतच त्याने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. गेले अडीज वर्ष या महिलेवर हा आरोपी अत्याचार करत होता. या काळात आरोपीकडून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे पीडिता प्रचंड तणावाखाली होती.


हे देखील वाचा – Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या