Home / महाराष्ट्र / Railway Recruitment 2025 : रेल्वेत सरकारी नोकरीची संधी.. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

Railway Recruitment 2025 : रेल्वेत सरकारी नोकरीची संधी.. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

Railway Recruitment 2025 : अनेकांचे स्वप्न असते सरकारी नोकरी करण्याचे. अशीच एक संधी आत रेल्वे घेऊन आलं आहे. रेल्वेत सध्या...

By: Team Navakal
Railway Recruitment 2025

Railway Recruitment 2025 : अनेकांचे स्वप्न असते सरकारी नोकरी करण्याचे. अशीच एक संधी आत रेल्वे घेऊन आलं आहे. रेल्वेत सध्या अंडर ग्रॅज्युएशन एनटीपीसी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली गेली आहे. १२वी पास तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी असणार आहे. रेल्वेत सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार असून; या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज दखल करु शकणार आहात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२५ असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

रेल्वेच्या या भरती मोहिमेत ट्रॅफिक असिस्टंटस कमर्शियल क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क अश्या वेगवेळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार देखील अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १९९०० ते २५,५०० रुपये पगार मिळणार असल्याची माहिती आहे. याचसोबत इतर महागाई भत्तेदेखील मिळणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार असून; तुम्हाला सीबीटी १ आणि सीबीटी २ परीक्षा मात्र द्यावी लागणार आहे. यामध्ये निवड झाल्यावरच तुम्हाला नियुक्त देखील केले जाईल.

उमेद्वारी पात्रता-

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याला १२वीत कमीत कमी ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना या परीक्षेत पात्रतेत सूट देण्यात आली आहे.


हे देखील वाचा – Satish Shah : अभिनेता सतीश शाह यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या