Raj Thackeray Family Doctor : राज ठाकरे यांचे भाषण नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. विशेषतः निवडणुकीच्या निकालानंतरचे त्यांचे भाषण जोरदार व्हायरल झाले, त्यामुळे त्याची चर्चा स्वाभाविक आहे. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज ठाकरें आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले.
राज ठाकरेंनी या भाषणात बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत, त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण बाजू स्पष्ट केली. उद्धव ठाकरेंनी देखील अनेक वाद प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली. या दोन्ही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे उपस्थितांना एक अनोखी अनुभूती मिळाली.
राज ठाकरे यांच्या फॅमिली डॉक्टरची माहिती सगळ्यात आधी नवाकाळच्या हाती-
काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले. त्यांनी विशेषतः डॉ. यादव या नावावर भर देत सांगितले की हे “मराठीच डॉक्टर आहेत,” परंतु वारंवार डॉक्टरांचा उल्लेख केल्याने अनेक लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली की हे मराठी डॉक्टर आहेत तरी कोण. त्यांचा ह्या वक्तव्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
याशिवाय नवाकाळ प्रतिनिधींनी देखील सगळ्यात आधी त्यांचा शोध घेतला. दादर पश्चिम येथे सुमारे पाच पिढ्यांपासून रहात असलेले डॉ. दीपक यादव हे ठाकरे कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर आहेत. राज ठाकरे कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य यांच्याकडे वैद्यकीय उपचारासाठी जात आले आहेत. डॉ. यादव कुटुंबाचे मूळ कोकणातील खेड येथून असून, ते १९४० साली मुंबईत स्थायिक झाले.
सध्या डॉ. दीपक यादव ह्यांची पाचवी पिढी दादर येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. यात असेही प्रकर्षाने लक्षात आले कि त्यांना प्रसिद्धीचा कोणतीही मोह नाही, ते खऱ्या अर्थाने आपल्या कामाला प्राधान्य देतात. त्यांच्या सेवेमुळे ठाकरे कुटुंबाला अनेक वर्षांपासून स्थिर आणि विश्वासार्ह वैद्यकीय आधार मिळत असल्याचे देखील यातून समोर आले. राज ठाकरे यांनी भाषणात फॅमिली डॉक्टरचा उल्लेख केल्यामुळे, या डॉक्टरांचा परिचय जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. डॉ. यादव यांचा समर्पित आणि खामखम कार्य हा या चर्चेचा मुख्य मुद्दा ठरला आहे.
हे देखील वाचा – Trump Joins Penguin Meme : पेंग्विन, ट्रम्प आणि ग्रीनलँड; मीम होतय व्हायरल..









