Home / महाराष्ट्र / कुंडमळा दुर्घटनेवरून सरकार,प्रशासनावर राज ठाकरेंचे ताशेरे

कुंडमळा दुर्घटनेवरून सरकार,प्रशासनावर राज ठाकरेंचे ताशेरे

मुंबई – पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेवरून (kundmala bridge collapse) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी शासन व...

By: Team Navakal
Raj thackeray kundmala bridge collapse

मुंबई – पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेवरून (kundmala bridge collapse) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी शासन व प्रशासनावर ताशेरे ओढले. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करून संताप व्यक्त केला.


हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली, जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का झाला नाही, असे सवाल करत प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे आहे.पण मुळात असे प्रसंग का उद्भवतात, सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरते बोलायचे झाले तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असे काही नियोजन करता येत नाही का ? प्रशासनजर काम करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचे नियोजन करून प्रशासनाकडून कामे करून का घेत नाहीत ? जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग . अशा प्रश्नांचा भडिमार राज ठाकरे यांनी केले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या

Share:

More Posts