Home / महाराष्ट्र / Raj Thackeray On Gautam Adani : अदानींवरील टीकेनंतर भाजपाने राज ठाकरेंचा केला तो फोटो व्हायरल; फोटो पाहताच राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray On Gautam Adani : अदानींवरील टीकेनंतर भाजपाने राज ठाकरेंचा केला तो फोटो व्हायरल; फोटो पाहताच राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray On Gautam Adani : मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी...

By: Team Navakal
Raj Thackeray On Gautam Adani
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray On Gautam Adani : मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. सरकार फक्त उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरच विशेष कृपादृष्टी का दाखवत आहे, असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. २०१४ नंतर अदानी समूहाच्या उद्योगधंद्यांचा झालेला झपाट्याने विस्तार दाखवत राज ठाकरे यांनी मुंबईकरांना आणि देशातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या सभेत त्यांनी अदानी समूहाच्या वाढत्या साम्राज्याविषयी काही व्हिडीओही उपस्थितांना दाखवले, ज्यातून मोठ्या उद्योगसमूहांना मिळणाऱ्या सवलती आणि सरकारी पाठबळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सूचित केले.

राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्षाकडून तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपने गौतम अदानी यांनी पूर्वी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन घेतलेल्या भेटीचा एक फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केला. या छायाचित्रामध्ये गौतम अदानी यांच्यासह राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे सर्वजण दिसत होते. हा फोटो शेअर करत भाजपने राज ठाकरेंच्या सध्याच्या टीकेतील विसंगती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या कालच्या जाहीर सभेतून भाजपला स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. एखाद्या उद्योगपतीची भेट घेतली म्हणजे त्याच्या प्रत्येक कृतीचे किंवा सरकारच्या धोरणांचे समर्थन केले, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद होतो, मात्र जनहिताच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

अदानी समूहावर केलेल्या टीकेनंतर काही जण अस्वस्थ झाले असून, त्याच अस्वस्थतेतून माझा आणि गौतम अदानी यांचा जुना फोटो समोर आणला जात आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ते सांगतात ‘हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता असून, गौतम अदानी स्वतः माझ्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते,’ असे त्यांनी सांगितले. घरी आल्यावर मी काय त्यांना हाकलून देऊ का?, माझ्या घरी गौतम अदानीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. कोणाशी ओळख किंवा संवाद आहे म्हणून जनहिताच्या मुद्द्यांवर गप्प बसणार नाही, ही आपली ठाम भूमिका असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

महाराष्ट्रावर किंवा मुंबई-ठाण्यासारख्या शहरांवर जेव्हा संकट येईल, तेव्हा राज ठाकरे कोणतीही दोस्ती किंवा व्यक्तिगत संबंध पाहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. राज्याच्या आणि शहरांच्या हितासाठी आवश्यक असेल तेव्हा कठोर भूमिका घ्यायला मागेपुढे पाहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. गौतम अदानी यांच्या उद्योगविस्तारावर टीका करताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

येत्या १५ तारखेला आपण सर्व सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका- राज ठाकरे (Raj Thackeray Thane)
निवडणूक नेमकी कशासाठी होत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत व्यक्त केले. ठाणे शहरासमोर आज अनेक गंभीर प्रश्न उभे असून, वाढत्या लोकसंख्येबरोबरच पायाभूत सुविधांवरील ताणही सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हे संकट केवळ भविष्यातील नाही, तर सध्या नागरिकांच्या उंबरठ्यावर उभे असून कोणत्याही क्षणी अधिक तीव्र रूप धारण करू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

आज योग्य निर्णय घेतला नाही, तर भविष्यात फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी ठाणे हे आपले शहर असल्याची भावना नागरिकांच्या मनात जागवली. शहर टिकवणे आणि सध्या आखण्यात येत असलेला, ठाण्याच्या अस्तित्वाला धक्का पोहोचवणारा आराखडा उध्वस्त करणे हे पूर्णतः मतदारांच्या हातात असल्याचे त्यांनी नमूद केले. ही लढाई सत्तेच्या हव्यासासाठी नसून, डोळ्यादेखत आपली शहरे हातातून जाऊ नयेत आणि इतरांच्या ताब्यात जाऊ नयेत, यासाठी सुरू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

येत्या १५ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नका, असे सांगत मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जर कोणी दुबार मतदान करण्याचा प्रयत्न करताना आढळला, तर त्याला तिथल्यातिथे जाब विचारावा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थितांना दिली. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूकता आणि निर्भीड भूमिका आवश्यक असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी मतदारांना जबाबदारीने व ठामपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना संक्रांतीला ‘अ‍ॅडव्हान्स’ नाही! निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला मोठा दणका; थकलेले पैसेच मिळणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या