Home / महाराष्ट्र / Raj Thackeray-Parth Pawar: राज ठाकरेंच्या भेटीला पार्थ पवार शिवतीर्थावर दोघांत दीड तास चर्चा

Raj Thackeray-Parth Pawar: राज ठाकरेंच्या भेटीला पार्थ पवार शिवतीर्थावर दोघांत दीड तास चर्चा

Raj Thackeray-Parth Pawar: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray-Parth Pawar: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दीड तास दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे समजू शकले नाही.


पार्थ पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार हे राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. त्यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात देखील त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. आता राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा केली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळल्याने भेटीचा अधिकृत तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि त्या अपघाताभोवती असलेल्या संशयास्पद पार्श्‍वभूमीवर पार्थ पवार यांनी घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.


या भेटीमागे विविध कारणे असावीत असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांनीही या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच मुद्यावर कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी पार्थ यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अध्यक्षपदासाठी सुचवले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी ‘मराठी पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा’ अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या घडामोडींनंतर पवार कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही भेट असू शकते, असेही बोलले जात आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या