Home / राजकीय / पालिकेत शंभर टक्के सत्ता येणार; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा विश्वास

पालिकेत शंभर टक्के सत्ता येणार; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा विश्वास

मुंबई – आगामी निवडणुकीत (election) मुंबई महानगरपालिकेवर (BMC) शंभर टक्के मनसेचीच (MNS) सत्ता येणार असा ठाम विश्वास मनसे अध्यक्ष राज...

By: Team Navakal
MNS chief Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

मुंबई – आगामी निवडणुकीत (election) मुंबई महानगरपालिकेवर (BMC) शंभर टक्के मनसेचीच (MNS) सत्ता येणार असा ठाम विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज वांद्रे (Bandra) येथील रंगशारदा सभागृहात (Rangsharda Hall) झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केला. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेशी (Shiv Sena UBT) युतीबाबत योग्य वेळी सूचना देऊ,असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.


या मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनी कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जायचे याचे मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केले. आपापसातील सर्व हेवेदावे विसरून निवडणुकीच्या कामाला लागा. मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा. मात्र मराठीचा आग्रह धरताना हिंदी (Hindi)भाषिकांचा द्वेष करू नका.कुणालाही न घाबरता पक्षाचे काम ताकदीने करा,अशा सूचना राज ठाकरे यांनी यावेळी दिल्या.


मुंबई महानगरपालिकेवर शंभर टक्के सत्ता आपलीच येणार आहे. युतीचे काय करायचे ते तुम्ही माझ्यावर सोडा. योग्य वेळी त्याबद्दलच्या सूचना तुम्हाला दिल्या जातील,असे सांगताना २० वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का नाही,असे म्हणत शिवसेनेशी जुळवून घेण्याची भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Web Title:
संबंधित बातम्या