Home / महाराष्ट्र / Raj Thackeray With MVA Leader : उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे मंत्रालयात एकत्र..

Raj Thackeray With MVA Leader : उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे मंत्रालयात एकत्र..

Raj Thackeray With MVA Leader : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाना उधाण...

By: Team Navakal
Raj Thackeray With MVA Leader

Raj Thackeray With MVA Leader : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाना उधाण आले होते. तसे संकेतद देखील दोन्ही पक्षातून दिले जात आहे. त्यानंतर मंगळवारी म्हणजेच आज पहिल्यांदाच राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली. या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, मनसेच्या ‘इंजिना’ची दिशा आता ठरल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे रईस शेख, आमदार जयंत पाटील यांच्यासोबतच इतर नेतेही यावेळी तिथे उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या या भेटीने नवीन राजकीय समीकरणाचे संकेत देखील दिले गेले. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले. त्यावेळी उद्धव ठाकरे मविआ सोडणार का? अश्या चर्चाना उधाण आले होते. पण, आता राज ठाकरेचं महाविकास आघाडीसोबत येण्याच्या दिशेने पावले पडत असल्याचे देखील दिसत आहे. आजच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीने महाविकास आघाडीत मात्र आणखी एक पक्ष येणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.


हे देखील वाचा –

ABVP–MNS : पुण्यात अभाविप – मनविसे वाद ! अमित ठाकरेंची आयुक्तांशी चर्चा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या