Home / महाराष्ट्र / वेदना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाहीत ! राजन साळवींचा टोला

वेदना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाहीत ! राजन साळवींचा टोला

धाराशिव – उबाठा (UBT) पक्षातील लोकांचे दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळेच लोक त्यांना सोडून...

By: Team Navakal
Rajan Salvi criticizes Uddhav Thackeray

धाराशिव – उबाठा (UBT) पक्षातील लोकांचे दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळेच लोक त्यांना सोडून जात आहेत असा थेट टोला शिंदे गटाचे (Shinde faction) माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज उद्धव ठाकरे यांना लगावला.
धाराशिव (Dharashiva) आणि लातूर (Latur) जिल्ह्याचे समन्वयक म्हणून एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) राजन साळवी यांची नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर साळवी यांनी आज धाराशिवमधील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला.

यावेळी राजन साळवी म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना फटका बसणार नाही. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कणखर आहे. मुंबई, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे काम असून ठाण्यासह अनेक भागात एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय नाही.उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत, त्याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत लोकांचे दुःख, वेदना, याचना पोहचत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात फक्त एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमची वाटचाल सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच प्रचंड मतांनी विजयी होईल.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या