Raosaheb Danve : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळते. त्यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नातू शिवम पाटील (Shivam Patil) आणि त्याच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिकच्या (Nashik Crime) सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातील अफरातफरी, फसवणुकीसंदर्भात दाखल झाला असून तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी असलयाचे समोर आले आहे. उद्योजक कैलास आहेर,असे तक्रारदाराचे नाव आहे.
तक्रारदार कैलास आहेर यांनी आपल्या कंपनीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शिफारशीवरून शिवम पाटील आणि इतर काही जणांना भागीदारी दिल्याचा आरोप केला असून आहेर यांच्या मते, त्यांनी १४ % कंपनीचे शेअर्स दानवे यांच्या सूचनेनुसार शिवम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते.

या शेअर्सच्या बदल्यात २५ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला असल्याचे देखील आहेर यांनी सांगितले. मात्र, त्यापैकी १० कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली नाही, असा खळबळजनक आरोप कैलास आहेर यांनी केला आहे. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं देखील त्यांनी पोलिसांत नमूद केलं आहे.
याबाबत केलास आहेर अधिक माहिती देताना म्हणाले कि, रावसाहेब दानवे यांचे साथीदार गिरीश नारायण पवारच्या सहकाऱ्यांनी माझी २०१८ मध्ये फसवणूक केली. मुंबईत दानवे भेटले होते. त्यांनी सांगितले की, मी मंत्री आहे, तुला सरकारी कामे आणून देतो, तुझ्या कंपनीचा उलाढाल दोन ते पाचशे कोटींपर्यंत वाढवून देतो. माझ्या नातवाला तू पार्टनर बनव. त्यावेळी मी याचा विचार केला की, इतका मोठा माणूस सांगत आहे. यामुळे माझ्या कंपनीत अजून लोकांना रोजगार देखील मिळेल. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्याप्रमाणे मी त्यांना होकार देखील दिला. पुढे त्यांनी माझ्या फॅक्टरीत भेट दिली. त्यानंतर हा सगळं प्रकार घडला. या सगळ्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे देखील वाचा – Pandharpur Kartiki Ekadashi 2025 : एकनाथ शिंदेच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा









