Ratnagiri : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक भागात आपापसातच वाद होताना दिसून येत आहे. असाच एक वाद आता रत्नागिरीत सुद्धा बघायला मिळत आहे. रत्नागिरीत नगर पालिकेचे आरक्षण जाहीर होताच जवजवळ सगळेच राजकारणी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतच चुरस बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मध्येच चुरस लागली आहे. या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेना शिंदे गटाकडून तीन ते चार नवे तर भाजपाकडुन तीन महिलांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. मात्र महायुतीतील हा तिढा सोडविण्याचे प्रयास पालकमंत्री उदय सामंत यांना करावी लागणार आहेत असे चित्र आहे.
रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना गटाने दावा केल्याने अजित पवारांच्या पक्षाने मात्र सावध भूमिका घेतली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सध्याच्या घडीला चार नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, समृध्दी मयेकर आणि वैभवी खेडेकर यांचा समावेश आहे. तर भाजपाकडून शिल्पा पटवर्धन, वर्षा ढेकणे तसेच शिवानी माने (सावंत) या तिघिंची नावे चर्चेत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी हे सातही उमेदवार प्रबळ मानले जात आहे. नगराध्यक्ष पदा सोबतच नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी देखील मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपा वरुन संघर्ष अधिकच तीव्र होत असलयाचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत महायुतितील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता असताना महायुतीतील सर्वच नेते यावर काय तोडगा काढणार याकडे आता संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणूका पार पडे पर्यत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा राजकीय कस पणाला लागणार असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महायुतीतील बडे नेते एकत्र असण्याच्या चर्चा करतात मात्र जिल्हास्तरीय बाबी त्यानुसार पार पडताना दिसत नाही आहे.
हे देखील वाचा – Bihar Politics : मलिन राजकारणातून बिहारची सुटका कधी?









