रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण ! गोपाळ झा याला पोलीस कोठडी

Receptionist Assaulted

मुंबई – कल्याणच्या नांदिवली (Nandivli) परिसरातील एका खासगी दवाखान्यात रिसेप्शनिस्ट असलेल्या तरुणीला मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत या दोघांना कल्याण न्यायालयाने (Kalyan court.)दोन दिवसांची पोलीस कोठडी (police custody)सुनावली आहे.

गोपाळ झा (Gopal Jha) त्याच्या भावासोबत या दवाखान्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एक मेडिकल प्रतिनिधी (एमआर) असल्याने रिसेप्शनिस्ट तरुणीने (medical representative)त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या गोकुळ झाने तिच्याशी वाद (argument)घालत, अचानक तिच्यावर हल्ला केला. त्याने तिच्या मानेवर, पायावर आणि छातीवर जोरदार मारहाण केली. यात तरुणीला गंभीर दुखापत (serious injuries)झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोईन शेख यांनी सांगितले की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तत्काळ उपचार सुरु केले आहेत. तरुणीला मान हलवताना खूप वेदना होत आहे. त्यामुळे या मारहाणीमुळे तिला पक्षाघात (paralysis) होण्याची शक्यता आहे.

मारहाणीनंतर पोलिसांनी काल रात्री गोपाळ आणि रणजीत झा या दोघांना अटक केली. आज त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर गोपाळने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर अन्याय झाला आहे , तसेच माझ्या भावाला का ताब्यात घेतले? असा सवाल करत आरडाओरडा केला. न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबी दिल्यावर तो शांत झाला.