ताडदेवमधील कोळी महिलांचे नियमानुसार पुनर्वसन

Rehabilitation of Koli women in Taddeo as per rules

मुंबई- ताडदेवच्या (Taddev) बेलासिस पूल (Bellasis Bridge) बांधकामामुळे बाधित झालेल्या कोळी महिलांचे (Koli Women’s) तेथील बाजार समिती इमारतीत पुनर्वसन करण्यात आले आहे.परंतु या पुनर्वसनाला जर्मन चाळ (German Chawl) समोरच्या इमारतीतील रहिवाशांनी विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे. या याचिकेला विरोध करत पालिकेने हे पुनर्वसन नियमानुसारच केले असल्याची माहिती न्यायालयात दिली आहे.

जर्मन चाळ समोरच्या इमारतीतील रहिवाशांनी या कोळी महिलांच्या त्या इमारतीतील पुनर्वसनाला विरोध केला आहे.त्यांनी तेथील मंडईच हलवण्याची विनंती आपल्या याचिकेत केली आहे. त्यामुळे या कोळी महिलांची या याचिकेत भाग घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती.यावर न्यायालयाने दोन आठवड्यात महिलांची बाजू मांडण्याची सूचना केली तर त्यानंतर याचिकाकर्त्यांना त्यांचे प्रतिउत्तर देण्यास सांगितले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे.दरम्यान काल झालेल्या सुनावणीत पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात पालिकेने याचिकाकर्त्यांचे सर्व मुद्दे फेटाळले आहेत. या मासळी बाजारामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होत नाही. बाजारातील सर्व प्रक्रिया ही इमारतीच्या आतल्या आवारात होत असल्याचे स्पष्ट केले.