Municipal council- राज्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad)अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज नगरपरिषद
(municipal council)अध्यक्षपदांसाठीही सोडत निघाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायत यांच्या नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. यानुसार, खुल्या प्रवर्गासाठी ६८, ओबीसींसाठी ३४ आणि अनुसुचित जाती प्रवर्गासाठी १७ नगरपरिषदांचे आरक्षण सुटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही सोडत काढण्यात आली.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निघालेल्या आरक्षण सोडतीनुसार, अनुसुचित जाती प्रवर्गासाठी ३३ जागा राखीव असणार आहेत. यापैकी १७ जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी ११ जागा सुटल्या असून यामध्ये सहा जागा महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी ६७ जागा सुटल्या असून यामध्ये महिलांसाठी ३४ जागा राखीव आहेत. खुल्या प्रवर्गासाठी १३६ पैकी ६८ नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाली आहेत.

बीडसोबतच भुसावळ, अकलूज, शिर्डी, मोहोळ, चिमूर येथील नगराध्यक्ष एससी प्रवर्गातील महिला होणार आहे. यवतमाळची नगराध्यक्षपदी अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. मालवण, कुळगांव-बदलापूर, धाराशिव, मुरूड जंजिरा, कर्जत (रायगड), रोहा, देसाईगंज, दौंड येथील नगराध्यक्ष ओबीसी प्रवर्गातील महिला होईल. परळी वैजनाथ, अंबरनाथ, रत्नागिरी, खेड, सावंतवाडी, जव्हार, राजापूर, पेण, अलिबाग येथे खुला प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण सुटले आहे.
नगरपंचायतीसाठी निघालेल्या सोडतीनुसार, अनुसुचित जाती प्रवर्गासाठी १८ नगराध्यक्षपदे आरक्षित झाली आहेत. त्यामध्ये नऊ महिलांना संधी मिळणार आहे. अनुसुचित जमाती प्रवर्गातून १३ नगराध्यक्ष होणार असून यामध्ये ७ महिलांना संधी मिळेल. ओबीसी प्रवर्गासाठी ४० जागा सुटल्या आहेत. यापैकी २० जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ७६ पैकी ३८ नगराध्यक्षपद राखीव असणार आहेत.
हे देखील वाचा –
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला क्लीन चिट पोलिसांनी…तपासले होते १०० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवणं धक्कादायक; हरभजन सिंगने BCCI च्या निर्णयावर व्यक्त केले आश्चर्य