Restoration Ceremony : सिंधुदर्गात तळेरे गावठण येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. सकाळी ९ :३० वाजता हा सोहळा ग्रामस्थांच्या आणि गावातील मानकऱ्यांच्या उपस्थित मोठ्या उत्सहात पार पडला. यावेळी सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन देखील जीर्णोद्धार समितीने केले होते. तळेरे गावठण येथील विठ्ठल रखुमाई मंदिर बऱ्याच काळापासून जीर्ण झाले होते.
मुंबई स्थित ग्रामस्थ आणि गावातील ग्रामस्थांची संयुक्त सभा होऊन मंदिर बांधकाम करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी गावातील आणि मुंबई स्थित ग्रामस्थ देखील उपस्थित होते. गावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी पंचक्रोशीतील भाविक, वारकरी, ग्रामस्थांनी उपस्थित राहायचे, असे आवाहन देखील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिर हे गावातल अतिशय आकर्षक आणि पवित्र असं केंद्रस्थान मानलं जात. बऱ्याच काळापासून हे मंदिर जीर्ण अवस्थेत होत गावातल्यानी पुढाकार घेऊन ह्या मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आज अखेर या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी ग्रामस्थ आणि मानकर्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
हे देखील वाचा – Tamil Nadu Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा..