Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) तिचा पासपोर्ट जवळपास पाच वर्षांनंतर परत मिळाला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात तिची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रियाच्या बाजूने निकाल दिला, ज्यामुळे तिला तिचा पासपोर्ट परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
पासपोर्ट परत मिळाल्यानंतर रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्राम काउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने एअरपोर्टवर पासपोर्ट हातात धरलेला फोटो पोस्ट केला आहे.
रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
पासपोर्ट परत मिळाल्याच्या आनंदात रियाने तिच्या मागील कठीण काळाची आणि अखंड संघर्षाची आठवण सांगितली. “गेली 5 वर्षे संयम हाच माझा एकमेव पासपोर्ट होता. मी असंख्य लढाया लढल्या. मनात एक न संपणारी आशा होती,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची तयारी दर्शवत रियाने लिहिले, “आज पुन्हा माझ्या हातात माझा पासपोर्ट आहे. मी माझ्या दुसऱ्या चॅप्टरसाठी सज्ज आहे! सत्यमेव जयते.”
पासपोर्ट जप्ती आणि जामीन
दरम्यान, जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये तिला जामीन मिळाला, परंतु एनसीबीने तिचा पासपोर्ट जप्त केला होता. परदेशात जाण्यासाठी तिला प्रत्येक वेळी ट्रायल कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक होते.
रिया चक्रवर्तीचे काम
रियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती शेवटची रूमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’ या चित्रपटात दिसली होती, ज्यात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तिने ‘सोनाली केबल’ आणि ‘जलेबी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. याव्यतिरिक्त, तिने ‘MTV Roadies: Karm Ya Kaand’ आणि ‘MTV Roadies: Double Cross’ सारख्या टीव्ही शोमधून पुनरागमन केले आहे.
हे देखील वाचा –Maharashtra News: महाराष्ट्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आता 24 तास खुली राहणार; मात्र ‘या’ गोष्टींना परवानगी नाही