Home / महाराष्ट्र / Mumbai’s Woman Mayor: सुलोचना मोदी ते रितू तावडे; आतापर्यंत ‘या’ 7 महिलांनी सांभाळली आहे मुंबई महापालिकेची धुरा

Mumbai’s Woman Mayor: सुलोचना मोदी ते रितू तावडे; आतापर्यंत ‘या’ 7 महिलांनी सांभाळली आहे मुंबई महापालिकेची धुरा

Mumbai’s Woman Mayor: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सुमारे...

By: Team Navakal
Mumbai's Woman Mayor
Social + WhatsApp CTA

Mumbai’s Woman Mayor: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सुमारे 48,000 कोटींचे बजेट असलेल्या या पालिकेचा ‘प्रथम नागरिक’ कोण होणार, या उत्सुकतेवर आता पडदा पडला आहे.

भाजपने रितू तावडे यांचा महापौरपदाचा अर्ज दाखल केला असून, त्या मुंबईच्या नव्या महिला महापौर म्हणून ११ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे सूत्रे हाती घेतील.

२५ वर्षांनंतर सत्तांतर आणि महिला आरक्षण

मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून असलेल्या शिवसेनेच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावला आहे. यंदाचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा होती, मात्र पक्षाने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निवडीनंतर शिवसेना नेते किशोरी पेडणेकर यांनी “भाजपने मराठी महापौर दिल्याने आम्ही आता उमेदवार उतरवणार नाही,” असे स्पष्ट करत स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मुंबईच्या ८ व्या महिला महापौर: एक ऐतिहासिक प्रवास

मुंबईच्या इतिहासात रितू तावडे या ८ व्या महिला महापौर ठरणार आहेत. १९५६ मध्ये मुंबईला पहिल्या महिला महापौर मिळाल्या होत्या, त्यानंतरचा हा प्रवास थक्क करणारा आहे:

वर्षमहिला महापौरपक्ष
1956सुलोचना मोदीकाँग्रेस
1994-95निर्मला सामंत-प्रभावळकरकाँग्रेस
1997-98विशाखा राऊतशिवसेना
2007-09डॉ. शुभा राऊळशिवसेना
2009-12श्रद्धा जाधवशिवसेना
2014-17स्नेहल आंबेकरशिवसेना
2019-22किशोरी पेडणेकरशिवसेना
2026रितू तावडेभाजप

राजकीय अस्मितेचा लढा

निवडणुकीच्या प्रचारात ‘मुंबईचा महापौर मराठी की हिंदू?’ यावरून मोठे रणकंदन माजले होते. भाजपने सुरुवातीला ‘हिंदू महापौर’ ही संकल्पना मांडली होती, मात्र नंतर ‘हिंदू मराठी’ चेहऱ्याला प्राधान्य देत रितू तावडे यांचे नाव पुढे केले. तावडे यांच्या रूपाने भाजपला मुंबईत आपला पहिला महिला महापौर मिळवून देण्यात यश आले आहे. आता मुंबईच्या विकासाचा गाडा या नव्या महिला नेतृत्वाखाली कसा धावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या