Home / महाराष्ट्र / Ritu Tawde : महापौर रितू तावडे यांच्या घड्याळाची चर्चा; १ कोटींच्या रोलेक्स घड्याळामुळे रितू तावडे चर्चेत

Ritu Tawde : महापौर रितू तावडे यांच्या घड्याळाची चर्चा; १ कोटींच्या रोलेक्स घड्याळामुळे रितू तावडे चर्चेत

Ritu Tawde : माजी महापौर रितू तावडे यांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेचा विषय ठरत असून, त्यामध्ये त्यांनी परिधान...

By: Team Navakal
Ritu Tawde
Social + WhatsApp CTA

Ritu Tawde : माजी महापौर रितू तावडे यांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेचा विषय ठरत असून, त्यामध्ये त्यांनी परिधान केलेल्या महागड्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत त्यांच्या मनगटावर दिसणाऱ्या घड्याळाची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे. राजकीय व्यक्तींच्या जीवनशैलीवर नेहमीच जनतेची नजर असते, त्यातच या महागड्या वस्तूच्या दाव्यामुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रितू तावडे यांनी परिधान केलेले हे घड्याळ जगप्रसिद्ध ‘रोलेक्स’ (Rolex) कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. घड्याळ तज्ज्ञ आणि नेटकऱ्यांच्या दाव्यानुसार, हे मॉडेल ‘यलो गोल्ड रोलेक्स डेटोना लाईट डायल’ (Yellow Gold Rolex Daytona Light Dial) असून, त्याची सध्याची बाजारपेठेतील किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी घड्याळाचे स्पष्ट दर्शन छायाचित्रात घडत असल्याने, सामान्यांपासून ते राजकीय विरोधकांपर्यंत सर्वजण यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रितू तावडे यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधींच्या संपत्तीबाबत आणि त्यांच्या खर्चिक आवडीनिवडीबाबत सोशल मीडियावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या नेत्यांकडे इतकी महागडी घड्याळे येतात कुठून?” असा सूर काही कमेंट्समधून उमटत आहे. या घड्याळाची अधिकृत किंमत किंवा त्याबाबत तावडे यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नसले, तरी चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीये.

विशेष म्हणजे, या प्रकरणाची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या घड्याळाचाही एक फोटो व्हायरल झाला होता, ज्याची किंमत साधारण ५० हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले गेले होते. आता रितू तावडे यांच्या कथित एक कोटींच्या घड्याळाची तुलना पंतप्रधानांच्या घड्याळाशी करून नेटकरी उपरोधिक टोले लगावत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या