Home / महाराष्ट्र / Rohit Pawar and Eknath Shinde : “इराणने माझं विमान पाडण्याची धमकी दिली होती” –एकनाथ शिंदे यांची कबुली; रोहित पवारांचा मोठा दावा

Rohit Pawar and Eknath Shinde : “इराणने माझं विमान पाडण्याची धमकी दिली होती” –एकनाथ शिंदे यांची कबुली; रोहित पवारांचा मोठा दावा

Rohit Pawar and Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे...

By: Team Navakal
Rohit Pawar and Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar and Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्याबाबत आणि ‘व्हीएसआर’ (VSR) विमान कंपनीच्या मालकाबाबत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, जानेवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेसाठी जात असताना, इराण आणि इराकच्या हवाई हद्दीत त्यांचे विमान पाडण्याचा गंभीर इशारा या दोन्ही देशांच्या लष्कराकडून देण्यात आला होता. या घटनेला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीदरम्यान दुजोरा दिल्याचेही रोहित पवार यांनी नमूद केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दावोस दौऱ्यातील ‘तो’ जीवघेणा प्रसंग-
या घटनेचा तपशील सांगताना रोहित पवार म्हणाले की, १६ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर होते. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या नियमांनुसार, कोणत्याही देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आगाऊ ‘फ्लाईट प्लॅन’ सादर करून परवानगी घेणे अनिवार्य असते. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाने आवश्यक परवानगी न घेताच इराणच्या हद्दीत प्रवेश केला. विमानाने इंधन भरल्यानंतर (Refueling) झुरिककडे कूच केली असता, इराणच्या लष्कराने विमानाला ताकीद दिली की, “जर तुम्ही तात्काळ मार्ग बदलला नाही, तर तुमचे विमान पाडले जाईल.” या विमानामध्ये स्वतः एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. इराणने हटकल्यानंतर विमानाने इराकच्या दिशेने वळण घेतले, परंतु इराकनेही तसाच कठोर पवित्रा घेतला. अखेर विमानाला माघारी फिरावे लागले आणि सर्व कायदेशीर परवानग्या पूर्ण केल्यानंतरच मुख्यमंत्री झुरिकला पोहोचू शकले.

तपास यंत्रणांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप-
दुसरीकडे, अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित असलेल्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या मालकाबाबतही रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंह यांना प्रशासनाकडून ‘राजेशाही’ वागणूक दिली गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या मते, एका गुन्हेगारी स्वरूपाच्या तपासातील प्रमुख संशयिताला चक्क शस्त्रधारी रक्षक पुरवण्यात आले होते. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या चौकशीत सिंह यांच्यासाठी नाश्ता, जेवण आणि मनोरंजनासाठी टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहण्याचीही सोय करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, चौकशीनंतर त्यांना प्रसारमाध्यमांच्या नजरेतून वाचवण्यासाठी पोलिसांच्याच काळ्या काचा असलेल्या शासकीय वाहनातून गुप्तपणे बाहेर नेण्यात आले.

राजकीय दबावाचा आरोप-
रोहित पवार यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देत संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, यापूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बहरीनला जात असतानाही व्ही. के. सिंह यांच्या विमानामुळे मोठा गोंधळ उडाला होता. “व्ही. के. सिंह यांच्या पाठीशी मोठे राजकीय हात असून, या ‘चिरकूट’ माणसाला वाचवण्यासाठीच दिवंगत अजित दादांना न्याय दिला जात नाहीये,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या