Rohit Pawar: मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडिओ प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सखोल चौकशी होणार. कोकाटे यांचा जबाब नोंदवल्यानंतर नाशिक न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, विधान परिषदेत कोकाटेंचा व्हिडिओ नेमका कोणी काढला आणि तो व्हायरल कसा झाला, या बाबतचा तपास होणार आहे. या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर बदनामीचा दावा देखील दाखल केला आहे.

आता या व्हिडिओ प्रकरणमुळे रोहित पवारांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. व्हिडिओ कोणी काढला, तो कसा व्हायरल झाला आणि पवारांकडे तो कसा पोहोचला, याचा सविस्तर तपास देखील होणार आहे.
तत्कालीन कृषिमंत्री असलेले कोकाटे हे विधान परिषदेत मोबाईलवर पत्ते (रम्मी) खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांनीही ही मागणी कायम ठेवली होती. अखेर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेऊन त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी दिली गेली. पण आता या प्रकरणामुळे याचा सविस्तर तपास होणार आहे.
हे देखील वाचा –