Home / महाराष्ट्र / Ashok Kharat : अशोक खरातचे ‘या’ नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

Ashok Kharat : अशोक खरातचे ‘या’ नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

Ashok Kharat : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा, स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याचे कारनामे समोर आल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा होत...

By: Team Navakal
Ashok Kharat News
Social + WhatsApp CTA


Ashok Kharat :
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा, स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याचे कारनामे समोर आल्यानंतर त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. यात खरात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर सदस्या आहेत. अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

स्वयंघोषित कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यावर होणाऱ्या आरोपांची मला काहीच कल्पना नाही असे म्हणणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे आणखी काही फोटो वायरल झाले आहेत.

या फोटोयामध्ये खरात यांच्या एका वाढदिवसाला रूपाली चाकणकर या खरात याला केक भरवताना दिसत आहेत. तसेच त्यानंतरच्या फोटोत कॅप्टन खरात हा रूपाली चाकणकर यांना केक भरवताना दिसत आहे.

या सगळ्या फोटोनंतर तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काहीच माहिती नाही, असे रूपाली चाकणकर यांना कसे म्हणता येईल असा रोकड सवाल उपस्थित होत आहे. समाज माध्यमांवरील वेगवेगळ्या फोटोंनंतर चाकणकर आणि खरात यांचे घनिष्ट संबंध होते, हे स्पष्ट होते.

असे सगळे असताना देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही? त्यांना नेमकं कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? त्यांच्याकडून महिला आयोगाचे अध्यक्षपद काढून का घेतलं जात नाही आहे? असे सवाल राज्यातील विरोधी पक्षाचे नेते विचारत आहेत.

चाकणकर या खरातला गुरूमाऊली म्हणत असल्याचे देखील समोर आले. त्यांच्यामुळेच आपणाला आयुष्यात काय करायचे हे कळल्याचे स्वत: त्यांनी भाषणात स्पष्ट केले होते.

याचसोबत खरात याचे आणखीन काही मान्यवरांसोबतचे फोटो वायरल होत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या