Aryan Khan – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan’s son) आर्यनविरोधात मानहानीचा खटला दाखल करणारे भारतीय महसूल सेवेतील वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडेंना (Sameer Wankhede)दिल्ली उच्च न्यायालयाने आज याचिकेत दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी आर्यन खानचे दिग्दर्शन असलेली बॅड्स ऑफ बॉलीवूड (Bads of Bollywood)ही वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix)आली होती. याविरोधात वानखेडेंनी मानहानीचा (Defamation case)दावा ठोकला होता. वानखेडेंचे वकील संदीप सेठी यांनी युक्तिवाद केला की, बॅड्स ऑफ बॉलीवूड ही वेबसीरिज दिल्लीतील प्रेक्षकांकडून पाहिली जाते. दिल्लीमध्ये ती प्रकाशित केली जात आहे. त्यामार्फत वानखेडे यांची बदनामी होत आहे.
यावर न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव (Justice Purushendra Kumar Kaurav)यांनी म्हटले की, वानखेडे यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात दाखल करण्यायोग्य नाही. तुम्ही याचिकेत सुधारणा करावी. त्यानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी याचिका दुरुस्तीसाठी वेळ मागितला.
हे देखील वाचा –
चकमक फेम प्रदीप शर्माने राज ठाकरेंची घेतली भेट