Home / महाराष्ट्र / Sandeep Deshpande News : मुंबई निवडणुकीत भाषिक तंटा; नही बटोगे, फिर भी पिटोगे’ संदीप देशपांडेची धमाकेदार प्रतिक्रिया

Sandeep Deshpande News : मुंबई निवडणुकीत भाषिक तंटा; नही बटोगे, फिर भी पिटोगे’ संदीप देशपांडेची धमाकेदार प्रतिक्रिया

Sandeep Deshpande News : राज्यात महानगरपालिकांची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक...

By: Team Navakal
Sandeep Deshpande News
Social + WhatsApp CTA

Sandeep Deshpande News : राज्यात महानगरपालिकांची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. अशातच मुंबईमध्ये “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…! अश्या आशयाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

याच पार्शवभूमीवर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या एक्सवर या संधर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टरबाबत बोलताना संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, काल ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पोस्टर लावले गेले त्याला आज आम्ही उत्तर देत आहोत, मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा संदेश त्यांनी एक्सद्वारे दिला आहे.

ते म्हणतात उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद मुळातच नाही. भारतीय जनता पक्षातील एआय जनरेटर माकडे हे सगळं करत आहेत. हा विषय आता आला कुटून. जाणीवपूर्वक भाजप हे उत्तर भारतीय आणि मराठी वाद तयार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे शिवाय भाजपाला उत्तर भारतीय मत हवी आहेत, म्हणून त्यांचे हे सगळे खेळ सुरु असल्याचे देखील देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.

या शिवाय त्यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया देताना देखील या बॅनरवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात मराठीचा अपमान केलात तर कानशिलात बसणार हे सत्य आहे. जर तुम्ही मराठीचा अपमान कराल तर ‘नही बटोगे फिर भी पिटोगे’ अश्या कठोर पण मिश्किल शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांवर देखील घणाघाती वार केले आहेत. शेलार यांना पक्षात कोण विचारत नसल्याने त्यांना रामदास आठवले चावले आहेत असा टोला देखील संदीप देशपांडेंनी लगावला आहे.

हे देखील वाचा – Varsha Gaikwad: ‘ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात घेतले नाही’; मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या