Home / महाराष्ट्र / Sandhurst Road Train Accident : सँडहर्स्ट रोड रेल्वे अपघात; कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

Sandhurst Road Train Accident : सँडहर्स्ट रोड रेल्वे अपघात; कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

Sandhurst Road Train Accident : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे काल सायंकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे (Protest)ठप्प...

By: Team Navakal
Sandhurst Road Train Accident
Social + WhatsApp CTA

Sandhurst Road Train Accident : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे काल सायंकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे (Protest)ठप्प झालेली लोकल सेवा सुरू होताच जीवघेणा अपघात झाला. रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना धडक बसून तीन जण ठार झाले. या घटनेनंतर आज मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला (Central Railway’s Chief Public Relations Officer Dr. Swapnil Nila)यांनी पत्रकार परिषद घेत रेल्वे कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी भरीस घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

https://www.instagram.com/reel/DQuPZXMiBls/?igsh=bjlnOTM5b2RoZnNz

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (Central Railway Mazdoor)आणि इतर संघटनांच्या नेतृत्वाखाली सीएसएमटी स्थानक परिसरातील उपविभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या (Divisional Railway Manager)कार्यालयासमोर आंदोलन झाले. पाच महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात अलीकडे रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

गर्दीच्या वेळी झालेल्या या आंदोलनामुळे सीएसएमटी, दादर (Dadar), ठाणे आणि कल्याणसह प्रमुख स्थानकांवर लोकल सेवा जवळपास तासभर ठप्प झाली. प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सँडहर्स्ट रोड स्थानकात लोकल उभी असल्याचे बघून काही प्रवाशी (Passengers) रूळावरून चालत जात होते. त्याचवेळी कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आणि काम सुरू केले. सीएसएमटीहून अंबरनाथकडे जाणाऱ्या जलद लोकलने काही प्रवाशांना धडक दिली. यात तीन जणांचा मृत्यू झाला.

डॉ. स्वप्नील नीला म्हणाले की, रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलनासंदर्भात फक्त लेखी पत्र सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना (CSMT Railway Police) दिले होते. या पत्रानुसार संघटनेकडून फक्त शांततेत निषेध नोंदवून ते निषेध पत्र डीआरएम यांना देणार असल्याचे कळवले होते. अपघात आणि आंदोलन या दोन वेगळ्या घटना आहेत. केवळ शांततेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण कर्मचाऱ्यांनी मोटरमनला काम करू दिले नाही. प्रवासी रुळावर उतरल्याने अपघात झाला. या प्रकरणी दोषींवर तसेच आंदोलन चिघळवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अपघातग्रस्तांना (Victims Families) मदत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.


हे देखील वाचा –

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना पुत्र प्राप्ती

Vivo चा नवीन स्मार्टफोन होणार लवकरच लॉन्च; ३० हजाराहून कमी किमतीत मिळणार हा स्मार्ट फोन

‘एशियाटिक’साठी आज मतदान !धर्मादायचा आदेश हायकोर्टात रद्द

Web Title:
संबंधित बातम्या