Home / महाराष्ट्र / Shaktipeeth highway: सांगलीत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठीची मोजणी रोखली

Shaktipeeth highway: सांगलीत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठीची मोजणी रोखली

Shaktipeeth highway: सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी येथे आज नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth highway) मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी...

By: Team Navakal
Shaktipeeth Highway
Social + WhatsApp CTA

Shaktipeeth highway: सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी येथे आज नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth highway) मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रोखले. या प्रसंगी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही. पुन्हा मोजणीला आल्यास आमच्या हातात दगड दिसतील, असा इशाराही शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना दिला आहे.

महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे मोजणीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तिसंगी गावातील बाधित शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच ते सहा वेळा अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून रोखले आहे. आजही अधिकारी आले तेव्हा गावकऱ्यांनी एकजुटीने मोजणी पथकाला विरोध करत माघारी पाठवले.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो. मग शक्तिपीठ महामार्गाची गरज काय, असा सवाल करत शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. तसेच हजारो एकर शेती उद्धवस्त करून सरकारला कुणाचा विकास करायचा आहे, असा मुद्दाही उपस्थित केला. दरम्यान, यापूर्वी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला तेव्हा गावातील बाधित शेतकऱ्यांनी मोजणीस नकार दर्शवला होता.


हे देखील वाचा –

अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले

डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांचे राज्यव्यापी आंदोलन

Web Title:
संबंधित बातम्या