Sanjay Raut : सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. राजधानी मुंबईत सर्वच राजकीय पक्ष विजयान्वेषणासाठी प्रचार, रणनीती आणि आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सक्रीय झाले आहेत. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे युती घडवण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असे असतानाच, विरोधकांच्या टीकेला समोर जात त्यांनी अनेक आव्हाने स्वतंत्रपणे पेलली. अश्या संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, या वेळेस मुंबई पोलीस देखील राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. या अचानक घडलेल्या घटनांमुळे शहरात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार विशेष लक्षवेधी ठरला आहे.

भांडुपमधील संजय राऊत यांच्या घराबाहेर एक संशयित गाडी फिरताना आढळली. या गाडीवर असलेल्या स्टिकरवर “बॉम्ब से उडा दूंगा” असे शब्द लिहिलेले होते. घटनेची तात्काळ माहिती पोलीस विभागाला देण्यात आली असून, पोलीस आता घराभोवतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यारा देखील तपासत आहेत. तसेच, परिसरात सुरक्षेचा व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मुंबई पोलिस घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.
हे देखील वाचा –
रेल्वे वेळापत्रकात १ जानेवारीपासून मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या प्रवासाचा अचूक वेळ..









