Sanjay Raut – एकनाथ शिंदे (Eknath shinde) हल्ली स्वतःला बाळासाहेब ठाकरे (Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray) समजू लागले आहेत,अशी बोचरी टीका शिवसेना उबाठाचे (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केली.
उद्या दसऱ्यानिमित्त उबाठाबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाही मेळावा आहे. त्याबाबत विचारले असता राऊत यांनी जळजळीत भाष्य केले. शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत.पण त्यांनी कधी शिवसेना स्थापन केली,हेच कोणाला माहीत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला एक विचार दिला. हिंदुत्व जागवण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यांच्या कर्तृत्वामुळेच भाजपा आज सत्तेवर आहे.शिंदेंची शिवसेना ही मोदी-शहांची उपकंपनी आहे.मोदी आणि शहांनी महाराष्ट्रात नवा चोरबाजार उघडला आहे. या चोरबाजारात चोरीचा माल विकला जात आहे.शिंदे जोपर्यंत दिल्लीला थैल्या पोहोचवतात तोपर्यंतच त्यांचे राजकारणात अस्तित्व राहील.पावसाळ्यात वळवळणाऱ्या गांडुळांसारखे शिंदे,मोदी आणि शहा राजकारणात काही काळ दिसतील आणि एके दिवशी नाहिसे होतील,अशा शब्दात राऊत यांनी घणाघाती टीका केली.
हे देखील वाचा –