Sanjay Raut : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याचे आपण पाहिले. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नसल्यचे चित्र आपल्या डोळ्यापुढे आहेच. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना पर्यायाने विरोधकांना फारसे यश मिळालेली नाही. परंतु, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
त्यापैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांच्या आता अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. याच पार्शवभूमीवर ठाकरे बंधूंची युती कधी होणार यावर प्रश्नचिन्ह उभ राहताना दिसत आहे. दरम्यान या सगळ्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी या सगळ्या प्रश्नांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या संबंधी त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे त्याआधी शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मोठ्या धूमधडाक्यात वाजत गाजत या युतीची घोषणा होईल असे देखील ते म्हणाले.
शिवाय कालच्या महायुतीच्या विजयावर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणतात कालचा शो हा हाउसफुल न्हवता. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली. सत्ताधारी पक्षाकडून कोट्यवधी पैशाची उधळण केल्याचा थेट आरोप देखील त्यांनी केला आहे. कालचे निकाल हे फक्त एक नाटक आहे. याच बरोबर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यशावर देखील बोट ठेवले आहे. ते म्हणतात निवडणुकीत शिवसेनेचं चिन्ह बाजूला ठेवा आणि मग निवडणुकीत उतरा. चोरलेला पक्ष आणि चोरलेल चिन्ह यावर तुम्ही आजही निवडणूक लढत आहात.असा घणाघाती वार त्यांनी शिंदे गटावर केला आहे.
पुढे त्यांनी भाजपा आमदार पराग शाह (MLA Parag Shah) यावर देखील सडकून टीका केली आहे. भाजपा आमदार पराग शाह रस्त्यावर उतरुन एका मराठी रिक्षावाल्याला मारतात. तो रिक्षावाला चुकला असेल, त्याने नियम मोडला देखील असेल. पण भाजपचे (BJP) सरकार तर सातत्याने नियम मोडत आहे. भाजपने नियमबाह्य पद्धतीने मुंबई अदानीला देऊन टाकली आहे. मग पराग शाह जाऊन अदानींची कॉलर पकडणार आहेत का, त्यांच्यात एवढी हिंमत आहे का?असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
पराग शाह हे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मिठागाराची आणि धारावीची जमीन अदानींना दिल्याबद्दल जाब विचारणार आहेत का? असा सवाल देखील या निम्मिताने संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी काँग्रेसच्या यशाबद्दल त्यांनी काँग्रेसचे अभिनंदन देखील केले आहे. पुढे त्यांनी आगामी निवडणुकीबाबत विश्वास देखील व्यक्त केला आहे. आगामी निवडणूक हि मुंबई वाचवण्याच्या दृष्टीने लढली जाईल असे देखील ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेनंतर लगेच ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसऱ्यांदा भेट घेण्यासाठी संजय राऊत हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले आहेत. आगामी बीएमसी निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमागचा मुख्य उद्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती आणि जागावाटपाचा तिढा सोडवणे हा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक कोणतं नवीन वळण घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – BMC Election 2026 : जागावाटपाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षांना सूचना; जागावाटपाची रस्सी खेच फार ताणू नका…









