Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : संजय राऊतांची ती पोस्ट वायरल..

Sanjay Raut : संजय राऊतांची ती पोस्ट वायरल..

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे पक्षाचे जेष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती काही दिवसांपासून ढासळली आहे. यामुळे त्यांना...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे पक्षाचे जेष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती काही दिवसांपासून ढासळली आहे. यामुळे त्यांना मुंबईतील भांडूपमधील फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून योग्य त्या तपासण्या सुरु आहेत. आता अशातच संजय राऊत यांनी रुग्णालयातून एक फोटो शेअर केला.

याआधी प्रकृतीची माहिती देणारी एक पोस्ट त्यांनी एक्स वर पोस्ट केली होती ज्यात ते काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असलयाचे लिहले होते. त्यावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या. आणि आता परत एकदा संजय राऊतांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेट देणारी अजून एक पोस्ट केली आहे. या संधर्भात त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये त्यांच्या हातावर सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ते एका पेपरवर पेन हातात धरून काहीतरे लिहिताना दिसत आहेत. या पेपरवर एडिट असे देखील लिहिलेल आहे त्यामुळे अनेकजण ते सामनाचा अग्रलेख लिहित असावे का?असा अंदाज बांधत आहेत.

संजय राऊत यांनी हे एक्सवर पोस्ट करत ह्या पोस्टला हटके कॅप्शनही दिले आहे. ते म्हणतात हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता! असे कॅप्शन त्यांनी यावेळी आपल्या पोस्टला दिले आहे.


हे देखील वाचा –

Omkar Elephant : मानव आणि वन्यजीव संघर्षवाढीला कोण जवाबदार?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या