Sanjay Raut : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाला आणि विरोधकांना मात्र अपयशाला सामोरे जावे लागले. त्यात राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नाहीत हे ताजे दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहेच. परंतु, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हि अटीतटीची असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईचा बॉस कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
याच पार्शवभूमीवर ठाकरे बंधूंची युती कधी होणार यावर आता राजकीय वर्तुळात ताशेरे उठताना दिसत आहेत. या सगळ्यावर संजय राऊत हे सातत्याने भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. मनसे आणि शिवसेनेतील जागावाटपाच्या तिढयाचा वाद हा कोणाहीपासून लपलेला नाही. यावर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसे आणि शिवसेनेच्या जागावाटपांवरून कोणताही विसंवाद नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणतात जागा मनसेकडे राहिली काय किंवा मग शिवसेनेकडे राहिली काय ती जागा मराठी माणसाच्या युतीतून निवडणून येण हे महत्वाचं आहे.
बऱ्याच काळापासून रखडलेल्या युतीच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. काल पर्यंत युती बाबत सोज्वळपणे बोलणाऱ्या राऊतांची भाषाच बदल्याचे चित्र या दरम्यान दिसून आले. ते म्हणतात ज्या दिवशी वरळीच्या डोम मध्ये दोन भाऊ एकत्र आले त्याच दिवशी युतीची घोषणा झाली पुढे ते असही म्हणाले कि
तुम्हाला नेमकी कसली चिंता आहे ? आता का घोषणा नाही, उद्या का घोषणा नाही.. अशी आगपाखड देखील त्यांनी यावेळी केली आहे. पुढे ते सांगतात युतीबाबत आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू तसेच तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही युती जाहीर करणार नाही. आमच जे नियोजन ठरलं आहे त्यानुसार आम्ही युती जाहीर करू अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे.
बंडखोरी केलेले शिवसैनिक जर पुन्हा शिवसेनेत(उबाठा) आले तर त्यांना तिकीट देण्याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी याचा कडाडून निषेध केला आहे. ते म्हणतात निष्ठावान कार्यकर्त्याचं तिकीट कापून गद्दारांना त्या जागा द्यावा येवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नसल्यचे ते म्हणाले. शिवाय त्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर देखील भाष्य केले आहे. महाविकास आघाडी अजिबात तुटलेली नाही महाविकास आघाडी कायम एकत्र आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम्ही सगळे अजूनही एकत्र असल्याची भूमिका त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.
हे देखील वाचा – Free Movie App : चित्रपट पाहण्यासाठी ‘हे’ ॲप्स वापरताय? सरकारचा मोठा इशारा; बँक खाते रिकामे होण्याचा धोका









