Home / महाराष्ट्र / Sanjay Raut VS Mahesh Kothare : संजय राऊतांचा महेश कोठारेंना खोचक टोला..

Sanjay Raut VS Mahesh Kothare : संजय राऊतांचा महेश कोठारेंना खोचक टोला..

Sanjay Raut VS Mahesh Kothare : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची चर्चा जोरदार सुरु आहे. आता अशातच चित्रपट अभिनेते तथा...

By: Team Navakal
Sanjay Raut VS Mahesh Kothare

Sanjay Raut VS Mahesh Kothare : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची चर्चा जोरदार सुरु आहे. आता अशातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे(Mahesh Kothare) यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. यावर आत उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) महेश कोठारेनां चांगलाच टोला लावला आहे. ते नक्की मराठीच आहेत ना असं म्हणत संजय राऊतांनी महेश मांजरेकरांवर निशाणा साधला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी यावेळी महेश कोठारेंना मारला.

महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले होते. ते म्हणाले ‘मी मोदी भक्त आहे’. शिवाय मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी त्यांनी यावेळी केला. भाजप म्हणजे आपले स्वतःचे घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीचा सुद्धा भक्त आहे. आपल्याला इथूनच नगरसेवक निवडून द्यायचा आहे.

मुंबईत नक्कीच कमळ फुलेल दिसेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी इथे आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नाही तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे देखील महेश कोठारे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणतात महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा मूलभूत अधिकार आहे. पण तुम्ही एक कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असे संजय राऊत म्हणले.


हे देखील वाचा – Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या