Home / महाराष्ट्र / Santosh Deshmukh Murder Case| संतोष देशमुख हत्या प्रकरणात २४ जूनला पुढील सुनावणी

Santosh Deshmukh Murder Case| संतोष देशमुख हत्या प्रकरणात २४ जूनला पुढील सुनावणी

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case) सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बीड (Beed)...

By: Team Navakal
Santosh Deshmukh Murder Case

बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case) सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बीड (Beed) येथील विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आजची सुनावणी आता मंगळवार २४ जून रोजी होणार आहे.आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam)उपस्थित नव्हते.हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहात आहे. तर आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.


३ जून रोजी झालेल्या सुनावणीत देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला होता. अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल पुरावे मिळाले नाहीत. याचसोबत कराड याला मोक्कातून दोषमुक्त करा असे म्हणणे वाल्मिक कराडच्या वकीलांकडून मांडण्यात आला होता. याच मुद्द्यावरून आज पुन्हा युक्तिवाद होणार होता पण न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.


संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आजची सुनावणी२४ जून रोजी होणार आहे. वाल्मिक कराडच्या कोणताही अर्ज केला असला तरी चौकशीत ते सर्व काही समोर येईल. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही १६ तारखेला आंदोलन करणार होतो पण शाळेचा पहिला दिवस आणि पेरणीचा काळ असल्याने आम्ही आंदोलन केले नाही. पण आमच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलनाची नवी दिशा ठरवत आहोत. सर्व आरोपींना एकाच कारागृहात ठेवू नये. कृष्णा आंधळेल अटक करावी. त्यांच्या पासून आम्हाला धोका आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे अजूनही बीडमध्ये बॅनर लावले आहेत. याकडे कोणाचे लक्ष नाही. आम्ही आरोपीला शिक्षा करा असे सांगत आहोत पण त्याचे बॅनर सर्वत्र लावले जात आहेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. गावकऱ्यांशी चर्चा करून लावरच आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या