Saptashrungi Transgender Chhabina – नवरात्र संपताच संपूर्ण महाराष्ट्रात आता कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु, काही ठिकाणी हा सण फक्त उत्साहापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकात्मता आणि पारंपरिक लोकसंस्कृतीचा एक अद्वितीय संगम म्हणून देखील ओळखली जातो. ते ठिकाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील स्वयंभू देवीचे स्थान असलेला सप्तशृंग गड.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत, हा सोहळा पार पडतो.. याची वैशिष्ठय म्हणजे विविध भागातून आलेल्या भक्तांची कावड यात्रा आणि गडाच्या परंपरेला जपणारा तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक यामुळे कोजागिरी पंर्णिमेचा सोहळा अविस्मरणीय ठरतो.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंग निवासिनी देवी, तिच्या साक्षीने हा उत्सव गडाच्या पौराणिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालतो आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तश्रृंगी गडावर तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक पार पडली आहे. देशभरातील तृतीयपंथीयांनी या मिरवणुकीसाठी हजेरी लावली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या उत्सवाची परंपरा आहे, गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीला शिवालय तळ्यावरती शाही स्नान घालून साडी चोळी परिधान करून तिचा सन्मान केला जातो. देवीच्या छबिन्याची सजावट करून ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते.
असे म्हटले जाते या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते, “कोऽजार्गति?- याचा अर्थ म्हणजे “कोण जाग आहे?” असा प्रश्न विचारते
जो भक्त या रात्री जाग राहून देवीची आराधना करतो, त्याला लक्ष्मी कृपेचा लाभ मिळतो. याच पार्शवभूमीवर गडावर देवी लक्ष्मीची विशेष पूजन व मंत्रांचे पठण केले जाते. गडावर उपस्थित असलेल्या भाविकांसाठी ही रात्र म्हणजे जागर आणि तपश्चर्येची साधना असते.
हे देखील वाचा –
दिवाळीनिमित्त टाटाची ‘नेक्सॉन’वर खास ऑफर; खरेदीवर होईल लाखो रुपयांपर्यंतची बचत; पाहा डिटेल्स