Mohan Bhagwat : सरसंघचालकाला निवृत्तीचे वय नाही, मात्र सरसंघचालक हा हिंदू असायला हवा, तो कोणत्याही विशिष्ट जातीचा असू शकतो, ब्राह्मण, क्षत्रिय किंवा इतर कोणत्याही जातीचा असू शकतो. पण तो हिंदू असावा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य मुंबईत आयोजित संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रश्नांना उत्तर देताना केले. या कार्यक्रमात अनेक मान्यवर व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या वेळी बोलताना ते म्हणाले की, सरसंघचालक पदासाठी वयाची अट नाही. माझे वय 75 वर्षे झाले आहे, तरीही संघाने मला काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मी त्यांना विचारले की निवृत्त होऊ का? तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही चालत आहात, बोलत आहात, निवृत्ती नको. संघात पद सोडण्याचा निर्णय संघटना घेते, व्यक्ती स्वतः नाही. संघातील इतर पदे ही अंतर्गत निवडणूक घेऊन ठरतात, पण प्रमुखाची निवड निवडणुकीद्वारे होत नाही. आधीचे सरसंघचालक त्यांच्या उत्तराधिकार्याची निवड करतात. साधारणपणे 75 वर्षांनंतर पदाशिवाय काम करावे असे म्हटले जाते. जेव्हा मला सांगतील तेव्हा मी पद सोडेन, पण कामातून कधीच निवृत्त होणार नाही.
मोहन भागवत म्हणाले की, संघाचे काम निवडणूक प्रचार किंवा आत्मप्रचार करणे नाही. आम्ही आमच्या कामाचा अति प्रचार करत नाही. जास्त प्रचारामुळे अहंकार वाढतो. प्रचार पावसासारखा असावा. योग्य वेळी आणि जितका आवश्यक तितकाच असावा. भाषेबाबत बोलताना भागवत म्हणाले की, संघाच्या कामकाजात इंग्रजी माध्यम वापरले जाणार नाही. कारण ती भारतीय भाषा नाही. मात्र जिथे गरज असेल तिथे इंग्रजीचा वापर केला जाईल; त्याला आमचा विरोध नाही. लोकांनी इंग्रजी इतकी चांगली बोलावी की इंग्रजी बोलणार्यांनाही ऐकावेसे वाटेल, पण मातृभाषा विसरू नये, असे मोहन भागवत म्हणाले. हिंदूंच्या लोकसंख्येबाबत विचारले असता ते म्हणाले की 21 ते 30 वयात मूल व्हावे आणि तीन मुले असावी असे वैद्यकीय शास्त्र सांगते. तीन मुले असल्याने ती मुले एकमेकांच्या सानिध्यात राहून मानसिक स्थिर राहतात. भारतातील घुसखोरांना हाकलले पाहिजे, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर कागद फाडून उधळल्याचा








