Home / महाराष्ट्र / साताऱ्यातील पालखी मार्गावर इतर वाहनांना प्रवेश बंदी

साताऱ्यातील पालखी मार्गावर इतर वाहनांना प्रवेश बंदी

सातारा- १९ जूनपासून सुरू होणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात...

By: Team Navakal
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi

सातारा- १९ जूनपासून सुरू होणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे.२६ जून ते ३० जून अखेर हा सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने या कालावधीत पालखी मार्गावर इतर वाहनांना मनाई आदेश जारी करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस (police) अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन पालखी ३० जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. नीरा, फलटण, लोणंदमार्गे पंढरपूर रस्त्याने पालखी जाणार आहे. यावेळी लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने पालखी मार्गावर वाहतूक समस्या निर्माण होवू नये यासाठी पोलीस, रूग्णवाहिका (Ambulance) आणि अग्निशामक वाहने आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना नीरा लोणंद पंढरपूर मार्गावर प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. २५ जून रोजी सकाळी ६ ते २९ रोजी च्या रात्री ७ वाजेपर्यत फलटण येथून पुणे, नीरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुणेकडे शिरगांव घाटातून वळवण्यात येत आहे . २८ जून रोजी रात्री ७ वाजेपर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक वाहनांना बंद करण्यात येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या