Home / महाराष्ट्र / School Names Action : शाळांच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल नावे वगळा; राज्य मंडळाच्या अखत्यारीतील शाळांना शिक्षण संचालनालयाचे कठोर निर्देश

School Names Action : शाळांच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल नावे वगळा; राज्य मंडळाच्या अखत्यारीतील शाळांना शिक्षण संचालनालयाचे कठोर निर्देश

School Names Action : शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग मानला जातो. अर्थात त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शाळा एक...

By: Team Navakal
School Names Action
Social + WhatsApp CTA

School Names Action : शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग मानला जातो. अर्थात त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शाळा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. जिथे आपण घडतो, धडपडतो, आणि पुन्हा नव्या उमेदीने उभे राहतो. त्यामुळे पालकांचा देखील आपल्या मुलांना सर्वोत्तम शाळेत भरती करण्याचा अट्टाहास असतो. पण यामध्ये बऱ्याचदा शाळा आपल्या नावामध्ये फॅन्सी शब्दांचे वापर करतात ज्यामुळे सहाजिकच विध्यार्थी आणि पालक यांचा गैरसमज होऊन त्यांची फसवणूक केली जाते.

शिवाय राज्य मंडळाच्या अखत्यारितील शाळा प्रशासन शाळांच्या नावांमध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’ अशा फॅन्सी शब्दांचा वापर करून पालकांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल आणि फसवणूक रोखण्यासाठी शिक्षण संचालनालयाने हे शब्द शाळांच्या नावांमधून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर नावात असे शब्द असलेल्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देशही संचालनालयाने दिले आहेत.

राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या अनेक शाळा आपल्या नावामध्ये फॅन्सी शब्दांचे उल्लेख करतात जस कि ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ किंवा ‘इंग्लिश मीडियम’ अशा शब्दांचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. या शब्दांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचा पालकांचा गैरसमज होतो. याचा गंभीर परिणाम पालक आणि विद्यार्थी यांच्यावर होण्याची शक्यता आहे. ‘सीबीएसई’ हे विशिष्ठ नाव केंद्र शासनाने स्थापन केलेल्या परीक्षा मंडळाचे आहे. त्यामुळे हा शब्द वापरणे कायदेशीरदृष्ट्या आयोग्य आहे.

याचबरोबर, ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘ग्लोबल’ असे शब्द वापरण्यासाठी संबंधित शाळेची परदेशातील शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल होईल अशी नावे जर असतील तर ती तात्काळ बदलण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांमध्येही असे शब्द आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचेही संकेत देखील संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांनी देखील या सगळ्या निकषांचे विचार करून निर्णय घ्यावे.

हे देखील वाचा – Tuljapur Election Result 2025 : निवडणुकीवर ड्रग्ज प्रकरणाचं सावट असतानाही गंगणेंचा दणदणीत विजय; तुळजापूरात भाजपाला घवघवीत यश

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या