Home / महाराष्ट्र / Seeds of Tulsi:या पद्धतीने लावा तुळस; कधीच सुकणार नाही

Seeds of Tulsi:या पद्धतीने लावा तुळस; कधीच सुकणार नाही

Seeds of Tulsi : तुळशीला (Tulsi) हिंदू (Hindu)धर्मात अत्यंत पवित्र असं स्थान आहे. त्यामुळे बऱ्याच घरामथ्ये (Home) तुम्हाला(Tulsi) हे तुळशीच...

By: Team Navakal
Seeds of Tulsi

Seeds of Tulsi : तुळशीला (Tulsi) हिंदू (Hindu)धर्मात अत्यंत पवित्र असं स्थान आहे. त्यामुळे बऱ्याच घरामथ्ये (Home) तुम्हाला(Tulsi) हे तुळशीच रोप दिसलं देखील असेल. या वनस्पतीला स्वतःच असं वेगळं महत्व देखील आहे. तुळस हि अत्यंत औषधी अशी आहे. तुळस घरच्या अंगणात असनं हे शुभ मानलं जात.  तुळशीचं रोप योग्य पद्धतीने लावणं हे दिखील महत्वाचं मानलं जात. तुळशीचं रोप योग्य पद्धतीने लावल्यास वास्तुदोष नाहीसा होतो. आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

 तुळशीच्या मंजुळा किंवा  रोपट्याच्या टोकाला येणाऱ्या बिया यापासूनही तुम्ही तुळस उगवू शकता. काही लोकांना तुळस कशी रूजवावी याची माहिती नसते. किंवा अनेकदा तुळस लावण्याची पद्धत योग्य नसल्या कारणाने तुळस मरते, सुकून जाते अथवा बहरत नाही.

तुळशीच्या मंजुळा अर्थात तुळशीचं फुल असतं. या फुलांमध्ये तुळशीच्या अगदी लहान लहान आकाराच्या बिया देखील लपलेल्या असतात. त्या कोवळ्या असताना कधीही तोडण्याचा प्रयत्न करू नये. ही फुलं व्यवस्थित सुकली अथवा काढण्यायोग्य झाली की हातावर घेऊन ती हळूवारपणे चोळा आणि त्यानंतर त्याच्यातल्या बिया दिसतील. या बिया कुंडीत रुजवल्याने तुळस उगवते.

पुरानानुसार धार्मिक कथांमध्ये तुळशीच्या मंजुळा तेव्हाच तोडाव्यात जेव्हा त्या भुऱ्या होतात. तसंच त्या रविवारी किंवा मंगळवारी या दिवशी तोडू नयेत. बिया लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात. सोबतच या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या की त्या पायाखाली येऊ नये. शिवाय एखाद्या तुळशीच्या रोपावर मंजुळा आल्या तर तुम्ही त्यातून नवीन रोप देखील लावू शकता.

मंजुळा रुजवण्याची प्रक्रिया-

सर्वात आधी मंजुळा पूर्णपणे सुकून मगच घ्याव्या. हलक्या हातांनी तळहातावर थोड्या चोळा आणि त्यातून बिया बाहेर येतील. एका कुंडीत गरजेनुसार माती टाका. थोडं ऊन आणि पाणी देता येईल अशा ठिकाणी कुंडी ठेवून त्या बिया त्यात रुजवा. काही दिवसांतच तुळशीचं रोप बघायला मिळेल.


हे देखील वाचा –

Benefits of ice cubes:रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर बर्फ लावावा का? डार्क सर्कल सुद्धा होतील नाहीसे..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या