Selling a minor girl राज्यात बलात्कार, अपहरण यांसारखे गुन्हे सरास घडताना आपण पाहतो. अशातच आता अजून एक खळबळजनक घटना घडली आहे.
आदिवासी कातकरी समाजातील हि अल्पवयीन मुली. ह्या अल्पवयीन मुलींना ५० हजार ते १.२५ लाख रुपयांत विकून त्यांचं जबरदस्ती लग्न लाऊन दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीच आला आहे.
लग्नानंतर या मुलींना मानसिक आणि शारीरिक छळाचा देखील सामना करावा लागला आहे. या गंभीर प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यस्थी करणारा आरोपी रवि कृष्णा कोर याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजून चार मुलींची देखील १ लाख ते सव्वा लाख रुपये घेऊन लग्न लावून विक्री केली गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
फिर्यादी अल्पवयीन पीडितेने दिलेलय गेलेल्या तक्रारीनुसार, तिच लग्न केवळ १४ व्या वर्षी संगमनेर तालुक्यातील जीवन बाळासाहेब गाडे याच्यासोबत जबरदस्तीने करण्यात आले. लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना देखील धमक्या देण्यात आल्या. तसेच ५० हजार रुपयांची रोख रक्कम देवाणघेवाण करून मुलीला विकले गेले.
लग्नानंतर काही काळ संसार सामान्य चाललासुद्धा, मात्र; काही काळाने पीडितेला जबरदस्तीने गरोदर केले गेले. पती आणि सासरच्या मंडळींकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरु झाला. त्या पीडितेला मुलगी झाल्यानंतर छळाची तीव्रता अधिक वाढली. यासोबतच गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून जन्मतारीखसुद्धा बदलली.
हे देखील वाचा –