Home / महाराष्ट्र / Sensex : सेन्सेक्स 2,400  अंकांनी घसरला ! 13.5 लाख कोटींचे नुकसान

Sensex : सेन्सेक्स 2,400  अंकांनी घसरला ! 13.5 लाख कोटींचे नुकसान

Sensex : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 2,400हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टीतही मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 13.5...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Sensex : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 2,400हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टीतही मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 13.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर दिवसाअखेरीस बाजार 1532 अंकांनी कोसळून बंद झाला.


आज सकाळच्या सत्रात 9.48 वाजताच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल 2,400 अंकांनी घसरून 76,610 या पातळीवर आला. तर निफ्टी 704 अंकांनी घसरून 23,746 वर पोहोचला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपन्यांची किंमत  सुमारे 439 लाख कोटी रुपयांवरून 436 लाख कोटी रुपयांवर घसरली. या घसरणीचा सर्वाधिक फटका बँकिंग, आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअरना बसला. अनेक प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. तेल कंपन्यांच्या शेअरमध्येही 7 ते 9 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.


याशिवाय रुपया आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 46 पैशांनी घसरून 92.33 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. तर  सोने 1800 तर चांदीचे भाव 4000 रुपयांनी कोसळले. मध्य पूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या