Shamrao Ashtekar passes away: कराडचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार (Former MLA) आणि माजी क्रीडा मंत्री शामराव अष्टेकर(Shamrao Ashtekar) यांचे वयाच्या ९१व्या वर्षी आज पुण्यात निधन झाले. आज सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बालेवाडी येथील कपिल उपवन सोसायटीत वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, त्यांचा एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
शामराव अष्टेकर यांचा जन्म २ ऑगस्ट १९३४ रोजी कराड येथे झाला. अष्टेकर समाजवादी काँग्रेसमधून १९८५ आणि १९९० मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी होते. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून देखील काम पाहिले होते. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची सातारा जिल्ह्यात सर्वत्र दखल घेतली जाते. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची सातारा जिल्ह्यात सर्वत्र दखल घेतली जाते.
राष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर शामराव अष्टेकर हे कराड उत्तर मधून आमदार म्हणून देखील निवडून आले. शामराव आष्टेकर हे शरद पवारांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कराड आणि सातारा परिसरातील क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या निधनामुळे कराड आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा –